पुण्यातील १५ इंजिनीअरिंग कॉलेजांना नोटीस ; विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनीअरिंग प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या नियमित प्रवेश फेऱ्या (कॅप) संपण्यापूर्वी रिक्त राहणाऱ्या जागांवर , संस्थास्तरावर प्रवेश करणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील १५ इंजिनीअरिंग कॉलेजांना नोटीसा पाठविल्या आहे. या कॉलेजांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश प्रक्रिय़ा राबविली असल्यास, विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉलेजांना प्रवेश प्रक्रियेचा तत्काळ खुलासा करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) दिले आहेत. 

पुण्यातील १५ इंजिनीअरिंग कॉलेजांना नोटीस ; विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता
पुण्यातील १५ इंजिनीअरिंग कॉलेजांना नोटीस ; विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता

राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार तिसरी प्रवेश फेरी आज सोमवारी ९ सप्टेंबरला संपत आहे. प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार तिसरी फेरी संपल्यानंतर कॉलेजांमध्ये जागा रिक्त राहतात. या जागांवर प्रवेशासाठी संस्थास्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत सीईटी सेलने नियमावली करीत, त्यात राबविण्याबाबत कमल १३ नुसार सूचना दिल्या आहेत. मात्र, इंजिनीअरिंग कॉलेजांनी सीईटी सेलच्या नियमांना केराची टोपली दाखवत, कॅप राऊंड संपण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून, कमी गुणांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत पुणे आणि पिंपरी चिंचवड इंजिनीअरिंग कॉलेजांची युवासेनेचे राज्याचे सहसचिव कल्पेश यादव यांनी सीईटी सेलकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे सीईटी सेळणे आक्रमक पवित्रा घेत, कार्यवाहीचा सुरुवात केली आहे 

सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांना कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार डीटीईच्या पुणे विभागीय कार्यालयाचे अधिकारी मा. रा. जाधव यांनी १५ इंजिनीअरिंग कॉलेजांच्या प्राचार्यांना नोटीस पाठवत तत्काळ खुलासा पाठविण्याचे आदेश दिले आहेत. संस्थेत नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्यास, संबंधित प्रवेश रद्द करण्यात येतील, याची गंभीर दखल घ्यावी, असे जाधव यांनी आदेशात नमूद केले आहे आहे. या कॉलेजांवर सीईटी सेल आणि डीटीईकडून काय कारवाई करण्यात येते, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

.....

सीईटी सेलकडे तक्रार करण्यात आलेल्या कॉलेजमध्ये दरवर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येतो. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे जमा करून त्यांना प्रवेश देण्यात येतात. या आर्थिक व्यवहाराचा कुठेही हिशोब नसतो. त्यामुळे या मोठा भष्टाचार असून, याची सखल चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

- कल्पेश यादव, सहसचिव, युवासेना

.....

नोटीस पाठविण्यात आलेले इंजिनीअरिंग कॉलेज

....

- डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आकुर्डी (६२७२)

- डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट पिसर्च, आकुर्डी (६८०२)

- डॉ. डी. वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी (६२०७)

- अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट , लोहगाव (६७३२)

- इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट (६१७९)

- पुणे विद्यार्थी ग्रृहाचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, पुणे (६२७४)

- ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, वाघोली (६३०७)

- गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, वाघोली (६१३८)

- गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, बालेवाडी (६१४४)

- मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कर्वेनगर (६१५६)

- मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, लोहगाव ( ६२०३)