सिंधुदुर्ग घटनेचा निषेध; दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन
कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बाणेर येथील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला नमन करत सिंधुदुर्ग या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच, स्वाभिमानी महाराष्ट्र शिवरायांचा अपमान सहन करणार नसून भविष्यात यावर लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासोबत घडलेली घटना अत्यंत क्लेशदायक आणि चीड आणणारी होती. या ठिकाणी पुतळ्याच्या माध्यमातून भ्रष्ट राजकारणाचे पितळ उघडे पडले असून या प्रकरणात सहभागी सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
येत्या निवडणुकीत महाराष्ट्राला लागलेली ही भ्रष्टाचाराची वाळवी साफ करून पुनःश्च छत्रपती शिवरायांची पावन भूमी ही ओळख मिळवून देण्यासाठी नागरिकांना सजग राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.