अग्निशमन दलाची चमकदार कामगिरी; दोघांना जीवदान, दोघांची

अग्निशमन दलाकडून नदी प्रवाहात अडकलेल्या दोघांना जीवदान; तसेच फ्लॅटमध्ये लॅच लागून अडकलेल्या दोन जेष्ठ महिलांची सुखरुप सुटका

अग्निशमन दलाची चमकदार कामगिरी; दोघांना जीवदान, दोघांची

अग्निशमन दलाकडून नदी प्रवाहात अडकलेल्या दोघांना जीवदान; तसेच फ्लॅटमध्ये लॅच लागून अडकलेल्या दोन जेष्ठ महिलांची सुखरुप सुटका

पहिल्या घटनेत काल मध्यराञी पहिल्या घटनेमध्ये अंदाजे ०१•३० च्या सुमारास एक इसम भिडे पुल येथील नदी पाञातून वाहत जात असल्याचे समजताच कसबा अग्निशमन केंद्र येथील वाहत घटनास्थळी पोहोचत जवानांनी सिदेश्वर घाट येथे किनारी येताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदर इसमास (अजयकुमार गौतम, अंदाजे वय ४५) सुखरुप बाहेर घेतले. 

दुसऱ्या घटनेत सकाळी ७ वाजता कर्वेनगर येथील नदीपाञात एक इसम अडकला असल्याची माहिती मिळताच वारजे व सिहंगड अग्निशमन वाहन बोटीसह रवाना होत घटनास्थळी पोहोचले. तिथे एक इसम नदीपाञात मधोमध अडकल्याचे निदर्शनास आले असता जवानांनी रश्शी, लाईफ रिंग, लाईफ जॅकेट याचा वापर करीत पाण्यात उतरुन अडकलेल्या इसमास धीर देत त्याला सुखरुप पाण्याबाहेर घेत कामगिरी पुर्ण केली. 

तिसऱ्या घटनेत सकाळी नऊच्या सुमारास सिहंगड रोड, सनसिटी येथे एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर सदनिकेत दरवाजा अचानक बंद झाल्याने दोन वयोवृध्द महिला अडकल्या असता जवानांनी शिडीच्या साह्याने गच्चीवर प्रवेश करुन घरामध्ये प्रवेश करुन त्या दोन महिलांना सुखरुप बाहेर काढले. 

अशाप्रकारे अग्निशमन दल विभागाने गेल्या आठ तासात दोन इसमांना पाण्याबाहेर काढत जीवदान दिले आहे आणि फ्लॅटमध्ये अडकलेल्या दोन वयोवृध्द महिलांना बाहेर काढत उत्तम कामगिरी केली आहे.