झारखंड मध्येही ऑपरेशन लोटस... चंपाई सोरेन भाजपच्या गळाला ?

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

झारखंड मध्येही ऑपरेशन लोटस... चंपाई सोरेन भाजपच्या गळाला ?

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. रांची येथे शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 'एक्स' सोशल मीडियावर दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भेटीचा फोटो सोमवारी रात्री उशिरा पोस्ट करत या संदर्भात घोषणा केली. "देशातील प्रतिष्ठित आदिवासी नेते" अशा शब्दात गौरव करत चंपाई सोरेन यांचे सरमा यांनी पक्षात स्वागत केले. त्यांच्यासह झामुमोचे आणखी काही बडे नेतेही भाजपचा झेंडा हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.चंपाई सोरेन हे शिबू सोरेन यांच्यानंतर जेएमएममधील सर्वात ज्येष्ठ आदिवासी नेते होत. जेव्हा हेमंत सोरेन यांनी ईडीच्या अटकेमुळे झारखंडच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांचे कॅबिनेट सहकारी जोबा माझी यांच्या जागी चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आले. यातून त्यांचं राजकीय वजन लक्षात येतं.