सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय झेप
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय विभागाच्या ६ विद्यार्थ्यांची इरास्मस मुंडस (Erasmus Mundus) या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. गौरव शेरे, रजत सक्सेना, गौरी पडळकर (भौतिकशास्त्र), अनुष्का सेन, रमा दबके (रसायनशास्त्र) आणि ईशा काबरा (भूगर्भशास्त्र) असे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या शिष्यवृत्तीसाठी एकूण १४६ भारतीय विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी गौरव शेरे यांना २८ जून रोजी झालेल्या इरास्मस मुंडस (Erasmus Mundus) प्री-डीपार्चर या कार्यक्रमासाठी बोलविण्यात आले होते. याप्रसंगी युरोपियन युनियनचे भारतातील राजदूत एच. इ. हर्व्ह डेल्फिन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या व्यतिरिक्त तेजस्विनी पावसे (पर्यावरण विज्ञान) हीला जपानमधील तोहोकू विद्यापीठात, गौरी पडळकर (भौतिकशास्त्र) हिला फ्रान्समधील रमन चरपाक फेलोशिप मिळली आहे. तर प्रणव भोसले (भौतिकशास्त्र) याला बेल्जियममधील केयू ल्यूवेन आणि सोनल रेगे (BLA) हिला युनायटेड किंग्डम चेस्टर विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय विज्ञान विभाग (Interdisciplinary School of Science), २०२२ मध्ये पहिली बॅच उत्तीर्ण झाली आहे. IDSS BSc. Blended, BLA आणि Master of Design मधून उत्तीर्ण होणारे हे विद्यार्थी आहेत.आंतरविद्याशाखीय विभागाच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी जगभरातील विविध विद्यापीठात शिक्षण घेत आहे. यापैकी फ्रान्स, इटली, बेल्जियम, ऑक्सफर्ड, मोनाश आणि मेलबर्नसह युरोपियन आणि ऑस्ट्रेलियन या विद्यापीठांमध्ये ३०% पेक्षा जास्त विद्यार्थी मास्टर्स कोर्स करत आहेत. तसेच आयसर, आयआयएससी, बनारस हिंदू विद्यापीठ आणि आयआयटी हैदराबादसह भारतीय विद्यापीठ आणि संस्थांमध्येही ५०% पेक्षा जास्त विद्यार्थी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत. BSc. Blended हा ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे, जो आंतरविद्याशाखीय विज्ञान विभाग (Interdisciplinary School of Science), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे मेलबर्न विद्यापीठाच्या सहकार्याने चालवला जातो. तसेच या विभागाद्वारेचे बी. ए. लिबरल आर्ट्स हा अभ्यासक्रमही चालवला जातो. या अभ्यासक्रमांविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी डॉ. भुषण खैरनार - ८०१००६९९२५ या क्रमांकावर तसेच dr.bhushankhairnar@gmail.com या ई-मेल संपर्क करू शकता, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.