खात्यात आले ५२५ रूपये... सीमेवरील जवानाने गाठले कारगिलवरून पुणे
सायबर चोरट्यांनी सर्वसामन्यांना हैराण करुन सोडले आहे. अनेकांच्या आयुष्यभराच्या कामाईवर डल्ला मारत आहेत. मात्र याचा त्रास आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जरी तुम्ही कुठलीही चुक केली नसेल तरीही तुम्ही त्यात भरडले जात असल्याचे पाहायल मिळत आहे. अशाच एका प्रकरणात भारतीय सिमेचे रक्षण करणार्या लष्करी जवानाला ५२५ रुपयांसाठी कारगील येथून इमरजन्सी सुट्टी घेवून पुणे येथील सायबर पोलिस ठाण्यात यावे लागले.
सायबर चोरट्यांनी सर्वसामन्यांना हैराण करुन सोडले आहे. अनेकांच्या आयुष्यभराच्या कामाईवर डल्ला मारत आहेत. मात्र याचा त्रास आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जरी तुम्ही कुठलीही चुक केली नसेल तरीही तुम्ही त्यात भरडले जात असल्याचे पाहायल मिळत आहे. अशाच एका प्रकरणात भारतीय सिमेचे रक्षण करणार्या लष्करी जवानाला ५२५ रुपयांसाठी कारगील येथून इमरजन्सी सुट्टी घेवून पुणे येथील सायबर पोलिस ठाण्यात यावे लागले.
सायबर चोरट्यांकडून कामाचे, पैशांचे आमिष, अटकेची भिती, घरातील विज बंद होणार, रिचार्ज संपले आहे अशी विविध कारणे संागून सर्व सामान्यांबरोबर उच्चशिक्षितांची मोठ्या प्रमाणात लुट केली जात आहे. अशा प्रकारची फसवणूक झाल्यानंतर फसवणूक झाले ते नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरबी) च्या वेब साईटवर आणि १९३० या क्रमांकावर तक्रार करतात. यानंतर सायबर चोरट्यांनी फसवणूकीची रक्कम ज्या ज्या बँक खात्यावर पाठविण्यात आले आहेत ती बँक खाते एनसीआरबीकडून फ्रिज केली जातात. एकदा का तुमचे बँक खाते फ्रिज झाले की तुम्हाला कुठलाही व्यवहार करता येत नाही. तुमच्या बँक खात्यावर पैसे येत नाहीत, ते तुम्हाला कोणाला पाठवता सुद्धा येत नाही. यामुळे इएमआय सुद्धा थकतात अशा अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागतात.
या कारगिर येथे कार्यरत असलेल्या लष्करी जवानाच्या बँक खात्यात कुठल्यातरी सायबर चोरट्याने फसवणूक केलेली ५२५ रुपयांची रक्कम बँक खात्यात जमा झाली होती. यामुळे एनसीआरबी मार्फत या जवानाचे बँक खाते फ्रिज करण्यात आले. यामुळे लष्करी जवानाच्या सॅलरी बँक खात्यावरुन घरी पैसे पाठविता येत नव्हते. त्यावरुन कुठलेच व्यवहार सुद्धा करत येत नव्हते. बँक खात्यातुन पैसे का पाठविता येत नाही याची विचारणा करण्यासाठी ते कारगीर येथील बँकेत गेले असता त्यांना सांगण्यात आले की तुमचे बँक खाते पुणे सायबर पोलिसांनी फ्रिज केले आहे. लष्करी जवानाला झालेला गोंधळ काही कळाला नाही. यावेळी संबंधित जवानाला समजुन सांगण्यात आले की, कुठल्याही तरी सायबर चोरट्याने सर्वसामान्य नागरिकाची फसवणूक केली आहे आणि त्यातील ५२५ रुपये ही रक्कम ही तुमच्या बँक खात्यात पाठविण्यात आल्याने बँक खाते फ्रिज करण्यात आले आहेे. यामुळे बँकेच्या व्यवहारावर बंदी घालण्यात आली आहे. त्यांना नेमके काय झाले हे समजुन सांगण्यात आले. या लष्करी जवानाची सर्व रक्कम ही बँक खात्यात होती आणि ती फ्रिज झाल्याने त्यांना पुढे काहीच करता येत नव्हते. त्यामुळे या जवानाने ५ दिवसांची इमरजन्सी सुट्टी साधारण अडीच हजार किलोमिटरचा प्रवास करुन पुणे गाठले.
यानंतर संबंधित जवान पुणे सायबर पोलिस ठाण्यात आला असता त्यांना झालेल्या गोंधळा बाबत समजून सांगण्यात आले. त्यांच्या बँक खात्यावर आलेली ५२५ रुपयासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यांच्या बँक खात्यातील विवादित ५२५ रुपये लिन करुन बँक खाते अनफ्रिज करण्यात आलेे. जो पर्यंत त्यांच्या खात्यात आलेल्या ५२५ रुपयांसदर्भात डिस्पुट सॉल्व होणार नाही तो पर्यंत ती रक्कम त्या जवानाला बँक खात्यातुन काढता येणार नाही. मात्र बँक खात्यांमधुन व्यवहार करता येणार आहे. सायबर चोरट्यामुळे एका कर्तव्यदक्ष जवानाला सिमेचे रक्षण करतांना इमजन्सी सुट्या घेवून पुण्यात यावे लागलेे. पुणे सायबर पोलिसांनी जवानाच्या कागदपत्रांची तपासणी करुन लगेच बँक खाते अनफ्रिज करुन दिले.
बँक खाते फ्रिज झाले तर काय करावे
सायबर चोरट्याने फसवणूक केलेल्या रक्कमेतील केवळ १० रुपये जर तुमच्या बँक खात्यवर आले तरीही तुमचे बँक खाते फ्रिज केले जाते. बँक खाते फ्रिज झाल्यानंतर तुम्हाला बँक तर्फे सांगितले जाते किंवा तुम्हाला संबंधित पोलिस ठाण्यातून इमेल पाठविला जातो. यानंतर तुम्ही पोलिस ठाण्याला भेटून अथवा इमेलच्या माध्यमातुन उत्तर देऊ शकता. तुमच्या बँक खात्यावर आलेली फसवून आलेली रक्कम वगळता इतर रक्कम अनफ्रिज करायला सांगू शकता.
सायबर चोरट्यांकडून फसवणूक केलेली रक्कम काही हजार बँक खातात पाठविण्यात येते. यामुळे तुमची चुक जरी नसली तरिही तुमचे बँक खाते फ्रिज करण्यात येतेे.
फसवणूक झाल्यानंतर एनसीआरबीच्या वेब साईटवर आणि १९३० या क्रमांकावर तक्रार करण्यात येते. एनसीआरबी ही केंद्र सरकारच्या अख्यारीत येते. तसेच त्यांच्या कार्यालयात आयटी इंजिनीयर आणि बँकेचे कर्मचारी असतात. फसवणूक करुन पाठविण्यात आलेली रक्कम ज्या ज्या बँक खात्यात पाठविण्यात आली आहेती सगळी बँक खाती. त्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याला याबाबत माहिती देऊन ती बँक खाते अनफ्रिज करण्यात येते. पुण्यातील एका प्रकरणात सायबर फसवणूकीची रक्कम ही तब्बल अडीच हजार बँक खात्यात पाठविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे बँक खाते अनफ्रिज करणे हे पोलिसांसमोर मोठा टास्क असणार आहे.
...........