अन्नधान्य वितरण कार्यालयात शिजवला भात..
निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याचा आरोप करीत पुण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जावेद खान यांनी महिलांसह अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांच्या टेबलावरच निकृष्ट दर्जाचा तांदूळ शिजवत अनोखे आंदोलन केले.

अनेक नागरिकांना निकृष्ट दर्जाचे तांदुळ रेशनिंग दुकानदार वितरीत करीत असल्याचा आरोप करत, त्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पुण्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताल साहेब यांच्या दालनात तांदुळ शिजवून त्यांना खाण्याची विनंती आंदोलकांनी केली. प्रथमदर्शनी तांदुळ निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत, ताबडतोब तो स्टॉक गोठविण्याचे आदेश दिल्याचे जावेद खान यांनी सांगितले.
सदर आंदोलनात साकीब आबाजी, सारिका जाधव, श्रद्धा भिसे, मयुरी रासकोंडा, वाजिद शेख, शुभम पन्हाले, दीपक चौहान व महिला उपस्थित होत्या.