एसटी कर्मचाऱ्यांचा संप... वाहतूक विस्कळित, पाहा कोठे सुरू, कोठे बंद

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक गावी जात असतात. अशा उत्सवाच्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांनी समो पुकारल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप... वाहतूक विस्कळित, पाहा कोठे सुरू, कोठे बंद

११ कामगार संघटना च्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २५१ आगारापैकी ३५ आगार पुर्णतः बंद आहेत. बाकीचे आगार अंशतः अथवा पुर्णतः सुरू आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत.

विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे .तेथे बंद चा इतका प्रभाव दिसून येत नाही. तथापि,मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत.

मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. तथापि, ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पुर्णतः बंद आहेत.

खानदेशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव ,पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू

आहे.