मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ८० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. राज्यातील महिलांसाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, आतापर्यंत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यापैकी जवळपास १ कोटी ३६ लाख महिला पात्र ठरल्या आहेत. अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ८० लाख महिलांना लाभ हस्तांतरण
मुंबई, दि. १४: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. राज्यातील महिलांसाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, आतापर्यंत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यापैकी जवळपास १ कोटी ३६ लाख महिला पात्र ठरल्या आहेत. अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. योजने अंतर्गत अधिकाधिक माता-भगिनींना सन्माननिधी वितरित करण्यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री, आदिती तटकरे यांनी एक्स माध्यमाद्वारे दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू *
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 14, 2024
मुंबई,दि.१४ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.
राज्यात आतापर्यत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे.यातील जवळपास… pic.twitter.com/rTsrzqVVrM
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस, ३२ लाख महिलांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आले, तर आज स्वातंत्र्यदिनी पहाटे ४ वाजेपर्यत एकूण ८० लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाले आहे.
बहिणीचे रक्षाबंधन आनंददायी करण्यासाठी महिला व बालविकास विभाग २४ तास कार्यरत !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 15, 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस ३२ लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्यदिनी पहाटे ४ वाजता ४८ लाख महिलांना त्यांच्या…
या योजनेची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी महिला व बालविकास विभाग २४ तास कार्यरत आहे, आणि या प्रक्रियेवर महिला व बालविकास मंत्री, आदिती तटकरे स्वतः लक्ष ठेवून आहेत. सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवून विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.