लग्नाआधीच विश्वासघात, प्रेमसंबंध लपवून तरुणीची साडेआठ लाखांची फसवणूक; युवक गजाआड
संसाराची स्वप्ने डोळ्यांत साठवून नव्या आयुष्याची तयारी करणाऱ्या तरुणीला होणाऱ्या पतीने दिलेल्या धोक्यामुळे भावनिक आणि आर्थिक दोन्ही पातळ्यांवर मोठा आघात बसला. दरम्यान तरुणीने या प्रकरणांत तक्रार दिल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाच्या नावाखाली तब्बल साडेआठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लग्नाआधीच विश्वासघात, प्रेमसंबंध लपवून तरुणीची साडेआठ लाखांची फसवणूक; युवक गजाआड
पुणे, प्रतिनिधी: लग्न हे दोन जीवन एकत्र आणणारे नटे मात्र, डोक्यावर अक्षता पडण्याआधीच एका तरुणीच्या आयुष्यात विश्वासघात तरुणाने केला. संसाराची स्वप्ने डोळ्यांत साठवून नव्या आयुष्याची तयारी करणाऱ्या तरुणीला होणाऱ्या पतीने दिलेल्या धोक्यामुळे भावनिक आणि आर्थिक दोन्ही पातळ्यांवर मोठा आघात बसला. दरम्यान तरुणीने या प्रकरणांत तक्रार दिल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाच्या नावाखाली तब्बल साडेआठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विश्रांतवाडी परिसरात राहणारी २९ वर्षीय तरुणी एका नामांकित वित्तीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. तिच्या तक्रारीनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात तरुण सागर नेटके याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. २०२५ मध्ये व्हॉट्सपवरील वधू-वर सूचक गटातून तरुणीची ओळख सागर नेटके याच्याशी झाली. दोन्ही कुटुंबांनीही या नात्याला संमती दिली. दरम्यान, १५ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साखरपुडा पार पडला. दोन्ही कुटुंबांनी नातेवाईकांच्या उपस्थितीत आनंद साजरा केला. सोन्याच्या अंगठ्या, कपडे, सजावट, पाहुणचार आणि विविध कार्यक्रमांवर मुलीच्या कुटुंबाने मोठा खर्च केला. त्यानंतर लग्नासाठी मंगल कार्यालय बुकिंग, केटरिंग, डेकोरेशन, बस्ता आणि आंदणाच्या वस्तूंसाठी मुलीच्या कुटुंबाने जवळपास साडेआठ लाख रुपये खर्च केला. मात्र, लग्नाची तारीख जवळ आल्यावर सागरच्या वागण्यात अचानक बदल दिसू लागला. फोन न उचलले, बोलण्यास टाळाटाळ करणे, यामुळे संवाद बिघडत गेला. याबाबत पीडितेने त्याच्या कुटूंबियांना विचारल्यावर रात्रीची शिफ्ट असल्याने वेळ मिळत नाही, असे कारण देत त्याच्या कुटुंबीयांनी विषय टाळला दरम्यान, ११ मेच्या रात्री सागरच्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक एका तरुणीने तेथे येऊन गोंधळ घातल्याची माहिती स्वतः सागरच्या आईने पीडितेला दिली. त्यानंतर तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी सागरला जाब विचारला. त्या वेळी ती जुनी ओळख आहे, आता कोणतेही संबंध नाहीत, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
परंतु काही तासांतच परिस्थितीने घेतले नाट्यमय वळण
त्या रात्रीच तरुणीच्या इंस्टाग्राम खात्यावर रेश्मा नावाच्या युवतीने मी सागरची गर्लफ्रेंड आहे. त्याच्याशी लग्न करू नकोस, असा स्पष्ट इशारा संदेशातून दिला. दुसऱ्या दिवशी रेश्मा स्वतः पीडित तरुणीच्या घरी पोहोचली. तिने सागरसोबतचे फोटो, व्हिडिओ आणि दोघे एकत्र राहात असल्याचे पुरावे दाखवल्याचा दावा केला आहे. हे सर्व पाहिल्यानंतर मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्नाच्या उंबरठ्यावर असताना होणाऱ्या पतीचे दुहेरी आयुष्य समोर आल्यानंतर तरुणीला मानसिक धक्का बसला. प्रेमसंबंधाची माहिती जाणीवपूर्वक लपवून लग्नासाठी तयार केले आणि आमच्याकडून मोठा आर्थिक खर्च करवून घेतला, असा आरोप करत पीडित तरुणीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.