बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर खळबळ
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची माहिती समोर आली आहे. पोलिस आणि अक्षय शिंदे यांच्यात झडप झाली, त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

न्यायालयीन चौकशीची मागणी
बदलापूर अत्याचार प्रकरणातील सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी याप्रकरणी न्यायालयीन चौकशी होईल, असे सांगितले आहे. सध्या या प्रकरणावर अधिकृत माहिती उपलब्ध नाही, त्यामुळे कोणतीही ठोस प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आरोपीविरुद्ध अनेक पुरावे एसआयटीकडे होते, आणि त्याला आरोपपत्राची प्रत मिळाली होती. उज्ज्वल निकम यांच्या मते, काही आरोपींना आपल्या गुन्ह्यांचा पश्चाताप होतो, त्यामुळे अक्षयने एन्काऊंटरपूर्वी असे काही पाऊल उचलले असावे. न्यायालयीन चौकशी झाल्यानंतर सर्व तथ्य समोर येईल, असेही निकम यांनी नमूद केले.
अक्षय शिंदे: कोण होता हा आरोपी?
अक्षय शिंदेचे वय 24 वर्षे असून तो बदलापूर येथील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता. याआधी तो एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. अक्षयचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते, आणि त्याच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ, भावाची बायको असा परिवार होता. विशेष म्हणजे, अक्षयची तीन लग्ने झाली होती, मात्र तिन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या.
गुन्ह्याची कबुली
विशेष तपास पथकाने (एसआयटी) बदलापूर येथील एका शाळेतील दोन बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिस चौकशीत दिली होती. तसेच, ओळख परेडमध्ये पीडित मुलींनी अक्षय शिंदेला ओळखले होते.