गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपणार… दगडूशेठ मंडळाचा मोठा निर्णय

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने विसर्जन मिरवणूक वेळेत होण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंडळ मागील वर्षाप्रमाणे यंदाही दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा हा निर्णय यापुढे कायम रहाणार आहे, असे ट्रस्टने स्पष्ट केले.

पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मोठे आकर्षण असते. देश विदेशातून लोक मिरवणूक पाहण्यासाठी येतात. अनेक वेळा विसर्जन मिरवणूक लांबते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने गेल्या वर्षी विसर्जन मिरवणूक वेळेत होण्यासाठी मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी दगडूशेठ हलवाई गणपती सायंकाळी सहा वाजत बेलबाग चौकातून मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला होता. त्याचा मिरवणूक वेळेवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले होते. दगडूशेठ गणपती ट्रस्टचा हा निर्णय यापुढे कायम रहाणार आहे, असे मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

हिमालयातील जटोली शिवमंदिरची प्रतिकृती

दगडूशेठ मंडळाच्या या निर्णयामुळे यंदाही पुण्यातील विसर्जन मिरवणूका लवकर संपणार आहेत. यावर्षी मंडळातर्फे हिमालयातील जटोली शिवमंदिरची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. त्या मंदिरात कर्नाटकातील श्री दत्त संप्रदायाचे ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते गणेश चतुर्थीला सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा होणार आहे.