..अन्यथा तुम्हाला जशास तसे उत्तर देऊ: युवासेना शहरप्रमुख सनी गवते
छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी झालेल्या राड्यामुळे पुण्यातील युवासेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात निष्कारण अडथळा आणण्याचा प्रयत्न कराल तर आम्हीही तुमच्या नेत्यांना जशास तसे प्रत्युत्तर देऊ असा इशारा युवासेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराध्यक्ष सनी गवते यांनी दिला.

छत्रपती संभाजी महाराज नगर येथे आज युवासेनेचे प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा दौरा होता. येथील रामा हॉटेलबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी शिवसैनिक व भाजप कार्यकर्ते आमने सामने आले होते.
'भाजपने आमच्या नेत्यांच्या दौऱ्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला याचा आम्ही जाहीर निषेध करतो. यापुढे जर असा उन्माद केला तर जशास तसे उत्तर देऊ' असा इशारा सनी गवते यांनी दिला आहे.