डिंभे धरण प्रकल्पाची चौकशी करा.... दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयाबाहेर शेतकरी संघटना करणार सत्याग्रह आंदोलन

डिंभे धरणातील प्रकरणाबाबत चौकशी कारण्याची मागणी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने केली असून, येत्या शुक्रवारपासून दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयाबाहेर सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे.

डिंभे धरण प्रकल्पाची चौकशी करा.... दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयाबाहेर शेतकरी संघटना करणार सत्याग्रह आंदोलन

डिंभे धरणाचे बुडीत क्षेत्रात गेलेले क्षेत्र किती आणि कोणत्या गावातले किती क्षेत्र गेले आहे याची यादी मागविण्यात आली आहे. मात्र काही अधिकार्‍यांना पाठिशी घातले जात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने सहकारमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे कृष्णदेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत बोलताना पाटील म्हणाले, डिंभे धरणाचे सहाय्यक अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे कर्तव्यात कसुर करणार्‍यांना पाठिशी घालत आहेत. त्यांच्यावर एफआयआर नुसार गुन्हा नोंदविण्यात यावा या मागणीसाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवार दि. 30 ऑगस्टपासून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. प्रशासनाने आंबेगाव तालुक्यातील कजपाच्या आदेशाची प्रत द्यावी, लाभ क्षेत्रातील वाटप केलेले एकुण क्षेत्र किती आहे त्याचबरोबर इतर मागण्या मान्य कराव्यात, असे ही पाटील यांनी सांगितले.

...........