पुण्यात महिलेचे शिर धडावेगळे, हात पाय देखील कापले... धड नदीत वाहत आले

नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहात एका महिलेचा धड आढळून आले. पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचे हात, पाय आणि डोके कापून धड नदीत फेकून दिले होते. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत आलेले धड एका व्यक्तीला दिसल्या नंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यात महिलेचे शिर धडावेगळे, हात पाय देखील कापले...  धड नदीत वाहत आले

चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अन्यंत घृणास्पद प्रकार समोर आला आहे. नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहात एका महिलेचा धड आढळून आले. पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचे हात, पाय आणि डोके कापून धड नदीत फेकून दिले होते. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत आलेले धड एका व्यक्तीला दिसल्या नंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहे. त्या वरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ ऑगस्टला सकाळी ११ वाजताच्या सुमारास खराडी येथील वॉटर फ्रंट सोसायटी जवळ सुरू असलेल्या जेनी लाईट कन्स्ट्रक्शनच्यामागे महिलेचे धड सापडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेच्या मृतदेहाचे धडापासुनचे शिर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय खुब्यापासुन कोणत्यातरी धारधार हत्याराने कापले आहेत. त्या नंतर महिलेचे धड कोठेतरी मुळा मुठा नदीपात्रात टाकून दिले. महिलेचे वय अंदाजे १८ ते ३० रंगाने सावळी, उजवे काखेच्या खाली काळा व्रण आहे, असे पोलिसांनी सांगितले.