युवक अडकले पुराच्या पाण्यात
खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग वाढविण्यात आल्याने नदीला पूर आहे. अचानक वाढलेल्या पाणी पातळीमुळे दोन तरूण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. अग्निशमन दलाकडून त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुठा नदीच्या पुरात अडकले दोन तरूण
प्रतिनिधी, पुणे
खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग वाढविण्यात आल्याने नदीला पूर आहे. अचानक वाढलेल्या पाणी पातळीमुळे दोन तरूण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. अग्निशमन दलाकडून त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शिवणे येथील दांगट पाटील इस्टेट कमान क्रमांक एकनजीक पाण्याचा प्रवाह वाढल्याने मध्यभागी बेटावर असलेले दोन जण अडकले आहेत. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून चार अग्निशमन वाहने, बोटीसह दाखल झाले आहेत. त्यांच्या बचावाचे प्रयत्न सुरू आहेत.
खडकवासला धरणातून सायंकाळी सहा वाजता मुठा नदी पात्रात २३ हजार १२२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
???? *सावधानतेचा इशारा* ????
*हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात दिनांक 24 व 25 ऑगस्ट 2024 रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात घाट माथा व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले असुन त्यात वाढ होण्याची श्यक्यता आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे..
......