Breaking News | पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले | Helicopter Crash

पुण्यात पौड भागात एक व्यवसायिक हेलिकॉप्टर कोसळले असल्याची घटना घडली आहे. पौड भागातील घोटावडे गावात हे हेलिकॉप्टर कोसळले आहे.

Breaking News | पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले | Helicopter Crash
Helicopter crash site near paud pune

पुणे: पुण्यात पौड भागात एक व्यवसायिक हेलिकॉप्टर कोसळले असल्याची घटना घडली आहे. पौड भागातील घोटावडे गावात हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. उड्डानानंतर काही वेळ घिरट्या घालून अचानक हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान या हेलिकॉप्टरमध्ये चार व्यक्ती होते त्यापैकी २ जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनास्थळी पोलिस व स्थानिक नागरिक दाखल झाले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेचे कारण अजून समजू शकलेले नाही. हे हेलिकॉप्टर कोणाच्या मालकीचे हे अजून समजू शकलेले नाही. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर अत्याधुनिक होते असे तज्ज्ञांचे मत असून खराब हवामानामुळे ही दुर्घटना झाली असल्याची शक्यता आहे.

हे हेलिकॉप्टर मुंबईहुन विजयवाडाकडे जात असल्याची माहिती आहे.

हेलिकॉप्टर कोसळतानाचा व्हिडीओ:

Helicopter Crash Video