महाराष्ट्र बंद मागे, उद्या पुण्यात शरद पवारांचे मूक आंदोलन

Maharashtra band cancelled, sharad pawar, supriya sule

महाराष्ट्र बंद मागे, उद्या पुण्यात शरद पवारांचे मूक आंदोलन
Maharashtra band cancelled

महाराष्ट्र बंद मागे, उद्या पुण्यात शरद पवारांचे मुक आंदोलन

बदलापूरसह महाराष्ट्रातील विविध भागांत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा निषेध व राज्य सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. असे पत्रकाद्वारे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप कळवले आहे.

या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, खा. शरदचंद्र पवार आणि खा. सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एक तासाचे मुक आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन जवळ, सकाळी १० ते ११ या वेळेत होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवारचे प्रसिद्धी प्रमुख अमोघ ढमाले यांनी दिली.