आंदेकरांचा खून करणाऱ्याला अटक; 'ए' कंपनीतील सदस्यानेच संपवले

वनराज आंदेकरचा गेम दुसरा, तिसरा कोणी नाही, तर आंदेकर गँगच्या नंबरकाऱ्यानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश कोमकर, असे त्याचे नाव असून, तो नात्याने वनराज आंदेकरचा दाजी आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली. 

आंदेकरांचा खून करणाऱ्याला अटक; 'ए' कंपनीतील सदस्यानेच संपवले
आंदेकरांचा खून करणाऱ्याला अटक; 'ए' कंपनीतील सदस्यानेच संपवले

पुण्यातील राष्ट्रवादीचे मा. नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर नाना पेठ भागात गोळीबार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या गोळीबारानंतर गंभीर जखमी झालेल्या यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. आंदेकरचा गेम दुसरा, तिसरा कोणी नाही, तर आंदेकर गँगच्या नंबरकाऱ्यानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश कोमकर, असे त्याचे नाव असून, तो नात्याने वनराज आंदेकरचा दाजी आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली. 

वनराज आंदेकर हे नाना पेठ याच परिसरात राहतात. ते याठिकाणी थांबले असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर ५-६ गोळ्या झाडल्या तसेच त्यांच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले. रात्री ९:३० च्या सुमारास ही घटना घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वनराज यांना त्वरित केईएम रुग्णालयात नेण्यात आले होते. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वनराज आंदेकर हे माजी दिवंगत नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचे पुतणे होते. २०१७ साली ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

दरम्यान पोलिस चौकीपासून अवघ्या १० मी अंतरावर ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचे नक्की कारण अजून समजू शकले नसते तरी, कौटुंबिक वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.