शहाराला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न - स्वप्नील दुधाणे
पुणे शहर अर्बन सेलच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जबाबदारी पेलण्याचा व पुणे शहाराला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सर्वांना सोबत घेऊन करू
आज महाराष्ट्र अर्बन सेलच्या अध्यक्षा आदरणीय वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते व महाराष्ट्र अर्बन सेलचे समन्वयक मा. नितिनजी जाधव, पुणे शहराचे माजी अध्यक्ष मा. नितीन भैया कदम, पुणे अर्बन सेलच्या सदस्य मा. नीता ताई गलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माझी पुणे शहर अर्बन सेलच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली असून सर्वांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी भविष्यात मी प्रामाणिक प्रयत्न करेन.
आजमितीस आपल्या देशभरातील शहरी भागात अनेक समस्या नव्याने निर्माण होत असून यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर शहराचे नागरिक या नात्याने आपण सर्वांनी प्रयत्नशील असणे आवश्यक असल्याचे मत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी व्यक्त केले आणि महाराष्ट्र अर्बन सेलची स्थापना करण्याचे निर्देश दिले.
या धर्तीवर अर्बन सेलची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा आदरणीय मा. खा. वंदनाताई चव्हाण यांची अध्यक्षा म्हणून निवड झाली. आज अर्बन सेल राज्यातील विविध शहरात नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत असून पुणे शहराचे माजी अध्यक्ष मा. नितीन भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या दोन वर्षांपासून पुणे शहरात कार्यरत आहोत. आजच्या घडीला आपल्या पुणे शहरातील रस्ते, पाणी, शिक्षण, पर्यावरण तसेच अन्य अनेक मूलभूत समस्यांना तोंड देत असताना नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा बनत या समस्यांना निवारीत करण्यासाठी समन्वयक म्हणून मी कार्यरत होतो.
आज अध्यक्षपदाची ही जबाबदारी स्वीकारताना आदरणीय वंदनाताईंनी व सर्व अर्बन सेलच्या पदाधिकारी यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार मानले आणि आजवर नागरिकांना विश्वासात घेऊन केलेल्या विकासकामांची ही पोहोचपावती असल्याचे नमूद केले. याप्रसंगी अर्बन सेलचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.