मुलींच्या मोफत शिक्षण योजनेची व्याप्ती वाढवून रक्षाबंधनाची भेट द्या : कल्पेश यादव यांची मागणी 

राज्य शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील मुलींच्या शिक्षणासाठी योजना सुरू असून मुलींचा शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काचा भार कमी झाला आहे. यामुळे सर्व सरकारी विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास कॅप राऊंड अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या मुलींना शिक्षण घेण्यासाठी मदत होईल, मात्र, ही मदत अत्यंत मर्यादित आणि तुटपुंजा स्वरूपाची आहे. महाराष्ट्रातील एकाही खाजगी किंवा अभिमत विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या मुलींना कोणतेही शुल्क माफ केले जाणार नाही. शुल्क माफ न केल्या जाणाऱ्या विद्यापीठांची संख्या सुमारे 40 च्या आसापास असून त्यांची यादी खाली दिली आहे. तर शुल्क माफ होणाऱ्या विद्यापीठाची संख्या सुमारे 15 एवढी आहे. या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या मोठी असली तरी त्यात बोटावर मोजता येतील एवढ्याच नामांकित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे शासनाने मुलींच्या मोफत शिक्षणासाठी राबवलेल्या योजनेची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यांची दाखल राज्य शासनाने घ्यावी. 

मुलींच्या मोफत शिक्षण योजनेची व्याप्ती वाढवून रक्षाबंधनाची भेट द्या : कल्पेश यादव यांची मागणी 
कल्पेश यादव

मुलींना मोफत शिक्षण देण्याची योजना केवळ सीईटी सेल अंतर्गत कॅप राऊंडमधून प्रवेश घेतलेल्या मुलींसाठी असणार आहे.संस्था स्थरावरील मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.त्यातही व्यवसायीक अभ्यासक्रमा प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी आहे.त्यामुळे शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवावी.ही योजना मर्यादित विद्यापीठांसाठी राबवली जात असल्याने खासगी आणि अभिमत विद्यापीठांना शासन नफेखोरी करण्यासाठी मोकळीक देत असल्याचे दिसून येते.हे चूकीचे असून मुलींना त्यांना हव्या त्या महाविद्यालयात मोफत शिक्षणाची संधी द्यायला हवी. 

*राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार सर्व अशासकीय अनुदानित/ विनाअनुदानित कायम/ विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद , शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जाळगाव, अहित्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, मुंबई विद्यापीठ आदी राज्य विद्यापीठांसह डेक्कन कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था या अभिमत विद्यापीठांमध्ये तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , एसएनडीटी महिला विद्यापीठ ,कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ या विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

एकट्या पुण्याचा विचार केल्यास सिंहगड कॉलेज ,मॉडर्न कॉलेज तसेच खाजगी विद्यापीठ म्हणून सुरू झालेल्या काही शैक्षणिक संस्थांची महाविद्यालये अजूनही पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत, तेथेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी प्लेसमेंट मिळते. त्यात डी.वाय.पाटील, व्हीआयटीच्या अशा काही महाविद्यालयांचा समावेश आहे. जी अजूनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. ज्या महाविद्यालयाकडून प्लेसमेंट मिळत नाही अशा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्सुक नसतात. त्यातच *गेल्या काही वर्षात अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांनी स्वतःला खाजगी विद्यापीठ म्हणून मान्यता घेतली आहे. त्यात डी. वाय. पाटील, डीईएस पुणे युनिव्हर्सिटी, पी ए इनामदार युनिव्हर्सिटी, विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी, फ्लेम युनिव्हर्सिटी, रायसोनी यूनिवर्सिटी, जेएसपीएम यूनिवर्सिटी, एमआयटी आर्ट डिझाईनिंग अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पिंपरी चिंचवड यूनिवर्सिटी, स्पायसर युनिव्हर्सिटी अशा शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. अनेक विद्यार्थी याच शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असतात.* त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून राज्य शासनाने खाजगी व अभिमात विद्यापीठांमध्ये सुद्धा मुलींना मोफत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यावी. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मानधन देण्याची वचनपूर्ती झाल्या निमित्त शासनाकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. रक्षाबंधन निमित्ताने राज्य शासनाने व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या *मुलींना खाजगी विद्यापीठांमध्ये तसेच अभिमत विद्यापीठांमध्ये सुद्धा मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याची भेट दिल्यास त्यांचे रक्षाबंधन खऱ्या अर्थाने साजरे होईल.* त्यामुळे मर्यादित शिक्षण संस्थांमध्ये मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना न राबवता त्याची व्याप्ती वाढवावी, अशी आमची मागणी आहे.

मुलींना मोफत शिक्षण न देणारी खाजगी विद्यापीठे*

1) अजिंक्य डी वाय पाटील यूनिवर्सिटी पुणे, 

2)अमिटी युनिव्हर्सिटी मुबई, 

3)ॲटलास स्किल टेक युनिव्हर्सिटी मुंबई, 

4)छत्रपती शिवाजी महाराज यूनिवर्सिटी नवी मुंबई, 

5)डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी 

6)डी वाय पाटील एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी 

7)डी वाय पाटील युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी,

8) डॉ.पी.ए. इनामदार युनिव्हर्सिटी 

9)विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी 

10) फ्लेम युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी 

11) आयटीएम स्किल युनिव्हर्सिटी 

12) जेएसपीएम युनिव्हर्सिटी 

13)एमजीएम युनिव्हर्सिटी

14) एमआयटी आर्ट डिझाईनिंग अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, 

15) एमआयटी विश्वप्राय अभय युनिव्हर्सिटी सोलापूर, 

16) एनआयसीएमएआर युनिव्हर्सिटी पुणे, 

17) पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी 

18) रामदेव बाबा युनिव्हर्सिटी

19) संदीप युनिव्हर्सिटी 

20) संजय घोडावत युनिव्हर्सिटी

21) सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी 

22) स्पायसर ऍडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी 

23)बालाजी युनिव्हर्सिटी 

24)सिंबायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी 

25)विश्वकर्मा युनिव्हर्सिटी,

मफत शिक्षणाचा लाभ न मिळणारी अभिमत विद्यापीठे

 भारती विद्यापीठ , सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी,डी वाय पाटील पुणे ,डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे , होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबई, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च मुंबई, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स मुंबई, नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज विले पार्ले , इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, जे जे स्कूल ऑफ आर्ट आर्किटेक्चर अँड डिझाईन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस,