तीन मित्र, पहाटे रेल्वे स्थानकातून चालत निघाले... पुढे त्यांच्यासोबत अघटित घडले

रेल्वेने पहाटे पुण्यात दाखल झालेल्या तरुणांनी पायी घरी जाण्याचा निर्णय घेतला. ते जवळपास पाच ते साडेपाच किलोमीटर अंतर चालले. त्यांना घरी पोहोचण्यासाठी अवघे सातशे ते आठशे मीटर अंतर राहिलेले असताना दुचाकीवरून चौघांनी त्यांना अडवून लुटले.

रेल्वेने पहाटे पुण्यात दाखल झालेल्या तरुणांनी पायी घरी जाण्याचा निर्णय घेतला. ते जवळपास पाच ते साडेपाच किलोमीटर अंतर चालले. त्यांना घरी पोहोचण्यासाठी अवघे सातशे ते आठशे मीटर अंतर राहिलेले असताना दुचाकीवरून चौघांनी त्यांना अडवून लुटले. शिवीगाळ आणि दमदाटी करून तिघाही विद्यार्थ्यांचे मोबाइल जबरदस्ती हिसकावून चोरटे पसार झाले. गरवारे महाविद्यालयजवळ ही घटना घडली.

कामानिमित्त मुंबईला गेलेले तीन विद्यार्थी पहाटेच्या वेळी रेल्वेने पुण्यात परतले. तेथून त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी रिक्षाचालकांनी अव्वाच्यासव्वा भाडे सांगितले. त्यामुळे तरुणांनी चालतच घरी जाण्याचा निर्णय घेतला. ते जवळपास पाच ते साडेपाच किलोमीटर अंतर चालले. त्यांना घरी पोहोचण्यासाठी अवघे सातशे ते आठशे मीटर अंतर राहिलेले असताना दुचाकीवरून चौघांनी त्यांना अडवून लुटले. शिवीगाळ आणि दमदाटी करून तिघाही विद्यार्थ्यांचे मोबाइल जबरदस्ती हिसकावून चोरटे पसार झाले. ही घटना कर्वे रस्त्यावर गरवारे महाविद्यालयाबाहेर घडली.

या प्रकरणी एका तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून डेक्कन पोलिसांनी चार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ ऑगस्टला पहाटे चारच्या सुमारास घडली. डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हा मूळचा रायगड जिल्ह्यातील मुरूड येथील रहिवासी आहे. तो शिक्षणानिमित्त पुण्यात राहत आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात तो बीसीएच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. तो एरंडवणा परिसरात मित्रांसह राहतो. त्याच्या एका मित्राचे आधार कार्ड अपडेट करावयाचे असल्याने तो आणि त्याचे दोन मित्र, असे तिघे जण १४ ऑगस्टला रेल्वेने मुंबईला गेले होते. मुंबईहून ते रात्रीच्या वेळेला पुन्हा रेल्वेने पुण्यात आले. पहाटे तीन वाजता ते पुणे रेल्वे स्थानकात दाखल झाले.

पुणे रेल्वे स्थानकातून पौड रस्ता किंवा डेक्कनला जाण्यास पहाटेच्या वेळी पीएमपी बस नसते. रिक्षा चालक अव्वाच्या सव्वा भाडे घेतात, त्यामुळे ते तिघे चालतच घरी जाण्यासाठी निघाले. स्टेशन परिसरात पुरेशी वर्दळ होती. त्यामुळे त्यांना भिती वाटली नाही. त्यांनी तासाभरात साडेपाच किलोमीटर अंतर पार केले. स्टेशनपासून ते गरवारे महाविद्यालयापर्यंत पोहोचले. त्यावेळी पहाटेचे चार वाजले होते. तेथे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तक्रारदाराशी संवाद साधला. एक फोन करायचा आहे, असे सांगून तक्रारदाराकडून मोबाइल घेतला. त्यानंतर आणखी एका दुचाकीवरून दोघे जण तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करून तक्रारदाराच्या दोन मित्रांचेही मोबाइल काढून घेतले. त्यावेळी तक्रारदार आणि मित्रांनी चोरट्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला.

..............